

Nagpur Municipal Election
sakal
नागपूर : आगामी नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय प्रारूप आरक्षित जागांचा प्रस्ताव प्रशासनाने अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर ११ नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे भवितव्य या सोडतीकडे लागले आहे. ‘कोणाचा प्रभाग खुला आणि कोणता राखीव?’ हा लाखमोलाचा प्रश्न इच्छुकांना सतावत आहे.