Nagpur : नागपूर महापालिका निवडणूकत राष्ट्रवादी, शिवसेनेची अग्निपरीक्षा

नागपूरमध्ये भाजपचे तब्बल १०८ तर काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporationsakal

नागपूर : शिंदे सेना-भाजप सरकारने नागपूर महापालिकेतील प्रभाग रचना पुन्हा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार प्रभाग चार सदस्यांचा तसेच जुनीच रचना कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता दिसते.

यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार निवडून आला होता. महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची रचना बदलताना सदस्यांची संख्या वाढवली होती. आघाडीने काही प्रभागाची रचना आपली राजकीय सोय बघून केली होती असा आक्षेप होता. त्यानुसार महाविकास आघाडी एकत्र लढली असती तर काँग्रेसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली असती.

तसा अंदाजही वर्तविला जात होता. मागासवर्गीय आणि मुस्लिम बहुल वस्त्या एकत्रित करण्यात आल्या होत्या. त्या महाविकास आघाडीसाठी भाजपपेक्षा जास्त अनुकूल होत्या. काँग्रेसने केलेल्या सर्व्हेत ६० जागा जिंकू असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे आघाडीचे उमेदवार चांगलेच उत्साहित झाले होते. मात्र राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर शिंदे-भाजप सरकारने सर्वच रचना बदलवण्याचा निर्णय घेतला. नगर विकास विभागाने जुनी प्रभाग रचना रद्द करून नव्याने करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूरमध्ये भाजपचे तब्बल १०८ तर काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. त्या खालोखाल १० बसपचे नगरसेवक होते. राष्ट्रवादीने फक्त खाते उघडले तर शिवसेनेची संख्या दोनवर थांबली होती. आता भाजप आणि शिवसेनेचे संबंध टोकाचे फाटले आहेत. त्यामुळे भाजपची मदतही यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांना होणार नाही. दुसरीकडे शिंदे सेना आणि मनसेसुद्धा सक्रिय झाली आहे. महापालिकेत उमेदवार उभे करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाने घेतला आहे. ते शिवसेनेच्याच मतांचा वाटा खेचून घेणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शहरातील अस्तित्वासाठी यंदाची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, याची दक्षता भाजपतर्फे घेतली जाणार असल्याचे कळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com