esakal | नागपूरमध्ये नेट, मोबाईल नसलेल्या गरीब मुलांसाठी ऑफलाईन शाळा
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरमध्ये नेट, मोबाईल नसलेल्या गरीब मुलांसाठी ऑफलाईन शाळा

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी समाजभवन, मंदिर, मैदानांमध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो गरीब पालकांना दिलासा मिळणार आहे.

नागपूरमध्ये नेट, मोबाईल नसलेल्या गरीब मुलांसाठी ऑफलाईन शाळा

sakal_logo
By
- राजेश प्रायकर

नागपूर: महापालिकेच्या शाळा (municipal schools) सध्या ऑनलाईन (Online) सुरू झाल्या आहेत. परंतु महापालिका शाळेतील अनेक गरीब मुलांकडे मोबाईल (Mobile) नाही तसेच काही ठिकाणी नेटवर्कचीही (Network) समस्या आहे. अशा मुलांसाठी महापालिका कोविड (Covid) नियमासह ऑफलाईन शाळा (Offline School) सुरू करणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी समाजभवन, मंदिर, मैदानांमध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो गरीब पालकांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: सार्शी गाव जगावेगळे! गाईंना विश्रांतीसाठी ठेवल्या जातात चक्क गाद्या

कोरोनामुळे सर्वच शाळा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या शाळाही ऑनलाईन सुरू आहेत. परंतु मागील वर्षी तसेच यंदाही शाळा सुरू झाल्यापासून ऑनलाईन वर्गात मुलांची संख्या तुलनेने फारच कमी आहे. याबाबत महापालिकेने सर्वेक्षण केले असता अनेक मुलांकडे मोबाईल नसल्याचे पुढे आले. गरीब पालक मुलांना मोबाईल उपलब्ध करून देऊ शकत नाही. याशिवाय काही भागात नेटवर्कची समस्या असल्याने मुलांना अऩेक अडचणी येत आहे. मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, मागे राहू नये, या हेतूने महापालिकेने ऑफलाईन शाळाही सुरू करण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा: मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं कामावर; नागपूर मनपाचा कारभार

एकाच परिसरातील १० ते १५ विद्यार्थ्यांना मंदिर, समाजभवन तसेच मैदानात बोलावण्यात येणार आहे. येथेच या मुलांची शाळा भरणार आहे. विशेष म्हणजे कोविड नियमाचे पालन करून या शाळा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय मागील वर्षी पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर कोरोनामुळे शाळेतच न गेलेल्या विद्यार्थ्यांसाठीही महापालिकेने तयारी केली आहे. पहिल्या वर्गात या मुलांनी काय शिकायला हवे होते, यावर साहित्य तयार करण्यात येणार असून ते त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. महापालिकेत ९५२ शिक्षक असून ते ऑनलाईन शाळा घेत आहेत. यातील काही शिक्षकांवर ऑफलाईन शाळेचीही जबाबदारी देण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा विधानसभानिहाय याच शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.

हेही वाचा: नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

मागील वर्षी मोबाईल, नेटची सुविधा नसलेल्या मुलांच्या शाळा घराची ओसरी, झाडाखाली, समाजभवन, मंदिरात घेण्यात आल्या. या शाळांना मुलांचा प्रतिसाद मिळाला. यंदाही ऑफलाईन शाळा सुरू करण्यात येणार आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या शाळा सुरू करण्यात येतील.

- प्रीती मिश्रीकोटकर, शिक्षणाधिकारी, महापालिका.

हेही वाचा: नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

महापालिकेच्या एकूण शाळा

----------------------------------------------

शाळा माध्यम संख्या

---------------------------------------------

प्राथमिक मराठी ३५

हिंदी ४७

उर्दू १९

इंग्रजी ०१

उच्च माध्यमिक मराठी ०८

हिंदी ११

उर्दू ०९

इंग्रजी ०१

loading image