esakal | मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं पुन्हा कामावर; नागपूर मनपाचा कारभार
sakal

बोलून बातमी शोधा

मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं कामावर; नागपूर मनपाचा कारभार

यंदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भोंगळ कारभाराच्याही मर्यादा पार केल्याचे दिसून येत आहे.

मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं कामावर; नागपूर मनपाचा कारभार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर: महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे अनेक किस्से चवीने चघळले जातात. परंतु यंदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भोंगळ कारभाराच्याही मर्यादा पार केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागात पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. एवढेच नव्हे दोन वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यालाही आपत्कालीन विभागात पाठविण्याचा प्रताप अतिक्रमण विभागाने केला होता.

हेही वाचा: मेळघाटच्या दिमतीला 48 डॉक्टरांची फौज

महापालिकेच्या आपत्कालीन विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने पावसाळ्यात विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली जाते. संकट काळात नागरिकांना तत्काळ सेवा देण्याच्या उद्देशाने आपत्कालीन विभागाने वेगवेगळ्या चमू तयार केल्या. या चमूमध्ये २२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची १ जूनपासून या विभागात कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहेत.

हेही वाचा: राज्यातील घरकुल लाभार्थी पेचात; सात वर्षांपासून निधी 'जैसे थे'च

यंदा अतिक्रमण विभागातर्फे आपत्कालीन विभागासाठी हवालदार अनिल चौहान आणि प्रभाकर आंबेकर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे विभागाला कळविले. जून ते सप्टेंबर या कालावधीत हे दोन्ही कर्मचारी सकाळी ८ ते ८ या काळात सेवेवर राहणे अनिवार्य होते. परंतु ते अनुपस्थित होते. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी यादी पाठविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा: शासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांना फटका; धान पट्ट्यातच नाहीत उद्योग

अनुपस्थितीमुळे आले उघडकीस

आपत्कालीन विभागाचे संचालन करणाऱ्या अग्निशमन विभागाला हे दोन्ही कर्मचारी सेवेवर आलेच नसल्याचे लक्षात आले. यासंबंधी चौकशी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. यात चौहान यांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला असल्याचे पुढे आले. तर आंबेकर हेसुद्धा सेवानिवृत्त झाले असल्याचे कळले.

loading image