
नागपूर : घरगुती भांडणातून 'पत्नीचा' खून
गडचिरोली : जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घरगुती भांडणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे, पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. (Nagpur crime news updates)
मृत महिलेचे नाव विद्या देवीदास चौथाले (वय २४) असे असून, आरोपी पतीचे नाव देवीदास पुंजाराम चौथाले (वय २६) असे आहे. देवीदास चौथाले याचा दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील विद्या नरोटे हिच्याशी आंतरजातीय विवाह झाला होता. पती-पत्नीच्या घरगुती भांडणावरून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.
आरोपी देवीदासने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः आष्टी पोलिस ठाण्यात हजर होऊन घरगुती भांडणावरून रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी अटकेत असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
Web Title: Nagpur Murder Case Husband Wife Fight Surrendered Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..