Nagpur Crime News: ‘पॅरोल’वरील कुख्यात गुन्हेगाराचा खून

चार जणांना अटक, मुख्य आरोपी फरार
Nagpur Crime News
Nagpur Crime Newssakal

नागपूर : पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगाराला त्याचाच साथीदार असलेल्या गुंडाने मित्रांच्या मदतीने संपविले. ही थरारक घटना अजनीतील पार्वतीनगर परिसरात बुधवारी (ता.११) १२ वाजताच्या सुमारास घडली.

दोघेही २०१३ साली केलेल्या एका खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. तीन आठवड्यापूर्वी दोघेही पॅरोलवर बाहेर आले होते.

विक्की उर्फ रितेश जयसिंग चंदेल (वय २८, रा.न्यू मनिषनगर) असे मृताचे तर राकेश पाली (वय २९ रा. पार्वतीनगर), शुभम कोकस (वय २०), सोमु पाली, लाल्या पाली, दिलीप अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की चंदेल हा २४ डिसेंबरला २८ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. तसेच आरोपी राकेश हा सुद्धा ३० डिसेंबरला २८ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता.

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास विक्की हा प्रियसी सरिता खोब्रागडे (वय २५, रा.खलासी लाईन, मोहननगर सदर) हिच्यासोबत फिरत होता.

दरम्यान तो नरेंद्रनगर येथील पानठेल्यावर आला. सिगारेट घेत असताना त्याचा राकेश पाली याचा भाचा शुभम कोकसशी वाद झाला. त्यातून त्याने शुभमला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शुभमने पाठठेला बंद करीत ‘हिम्मत असल्यास घराकडे

पॅरोल’वरील गुन्हेगाराचा खून

ये तुला बघून घेईल’ अशी धमकी दिली. त्यामुळे रागात असलेल्या विक्कीने आपल्या प्रियसीसह त्याचा पाठलाग केला. दोघेही शुभमच्या पार्वतीनगर येथील घराजवळ पोहचले. तिथे शुभमने त्याचा मामा राकेश पाली याला सर्व प्रकरण सांगितले.

त्यामुळे राकेश पाली, सोमु पाली, संजय पाली व लाल्या पाली यांनी एकत्र येत, विक्कीवर हल्ला चढविला. कुऱ्हाड, रॉड आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

विक्कीच्या प्रियसीने पळ काढत अजनी पोलिस स्टेशन गाठून ही संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, सोमु पाली, संजय पाली व लाल्या पाली यांना अटक केली. मात्र, प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश पाली अद्याप फरार आहे.

दोघेही एकाच खुनात आरोपी

विक्कीसह राकेश पाली आणि संजय वाघाडे या तिघांनी मिळून २०१३ साली आशिष बुधबावरे नामक व्यक्तीचा अजनी चौकात खून केला होता.

या प्रकरणात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यातून ते मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षा भोगत होते. त्यापैकी विक्की चंदेल तर राकेश पाली २८ ला पॅरोलला बाहेर आले होते.

प्रियसीच्या डोळ्यादेखत थरार

विक्कीला राकेशसह त्याचे भाऊ आणि भाचा हे कुऱ्हाड आणि इतर शस्त्रांनी वार करीत असताना, विक्कीची प्रियसी सरीता आपल्या डोळ्यादेखत विक्कीच्या मृत्यूचा थरार बघत होती.

विक्कीला घेरल्यावर आपला जीव वाचवून ती कार खाली लपून बसली. तिने फोनवरून मित्र समीर यादव आणि मैत्रिण रुपाली इंगळे यांना लोकेशन देऊन बोलाविले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com