Nagpur Crime: ‘तूम मेरी नही तो किसीकी नही हो सकती’; विवाहितेला धमकी , शरीरसुखाची मागणी, नंदनवन पोलिसांकडून गुन्हा दाखल
Nagpur News: विवाहितेला मध्यरात्री अनोळखी व्यक्तीकडून धमकीचे व अश्लील फोन येण्याच्या धक्कादायक घटना नंदनवनमध्ये समोर आली. त्रास असह्य झाल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत केली, त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
नागपूर : मोबाइलवर महिलेला संपर्क करीत ‘तूम मेरी नही तो किसी की नही हो सकती’ असे म्हणून धमकी देत एकाने शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.