निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीत घडामोडींना वेग! 'या' मतदारसंघाच्या अध्यक्षांची उचल बांगडी

ncp
ncpesakal

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील चार विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बदलले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाकरी फरिवल्याने पक्षातील काही नेते नाराज झाले असून शहाध्यक्षाच्या निर्णयाचा प्रदेश प्रवक्त्यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

पूर्व नागपूरमध्ये नवनियुक्त अध्यक्ष म्हणून चिंटू महाराज व कार्याध्यक्षपदी आकाश थेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिममध्ये राजा बेग यांची पश्चिम नागपूरच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

दक्षिण नागपूरचे माजी अध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना बदलवून मोरेश्वर जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजूसिंग चव्हाण व कार्याध्यक्षपदी आशुतोष बेलेकर यांची नेमणूक करण्यात आली.

ncp
Nagpur Accident: नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू

येथील माजी अध्यक्ष भय्यालाल ठाकूर यांनी तब्येतीच्या कारणावरून तर पश्चिमचे माजी अध्यक्ष शैलेश पांडे यांना महापालिकेची निवडणूक लढायची असल्याने त्यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.

मंगळवारी गणेशपेठ येथील पक्षकार्यालयात राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुचनेनुसार हे बदल करण्यात आल्याचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले. यावेळी प्रदेश महासचिव रमण ठवकर, संतोष सिंह, शिव भेंडे, अशोक काटले, प्रशांत बनकर, नसीम सिद्दिकी आदी उपस्थित होते.

प्रवक्त्यांनी नोंदवला निषेध

महापालिकेची निवडणूक तोंडवर आहे. अशा परिस्थितीत संघटनेत फेरबदल करणे चुकीचे आहे. संघटनेते फेरबदल करण्याचा अधिकार शहर अध्यक्षाला नाही. वरिष्ठांनी यात लक्ष घालावे अशी मागणी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केली. या फेरबदलाचा त्यांनी निषेधही नोंदवला.

ncp
Nagpur: भाजपला OBC नेत्यांचे नेतृत्व मान्य नाही; नागपूरातून जयंत पाटलांचा भाजपवर निशाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com