esakal | काँग्रेसचा समित्यांसाठी राष्ट्रवादीला ठेंगा, राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

congress ncp

काँग्रेसने दाखवला ठेंगा; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीचा (mahavkas aghadi) प्रमुख घटक असतानाही नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एकही कमिटी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकमंत्री नितीन राऊत (minister nitin raut) आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (minister sunil kedar) यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा: पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

आघाडीने शासकीय समित्या वाटपाचे सूत्र ठरवले आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्यास ६० टक्के तर उर्वरित दोन पक्षांना प्रत्येकी २० जागा देण्याचे ठरले आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हे सूत्र मानायला तयार नाही. सुनील केदार यांनी तर सावनेर मतदारसंघात काँग्रेसशिवाय दुसऱ्या कुठल्याच पक्षाला एकही जागा मिळणार नाही असे ठणकावून सांगितले. उर्वरित कामठी, उमरेड, हिंगणा, रामटेक या विधानसभा मतदारसंघातही एकही जागा राष्ट्रवादीला देण्यात आलेली नाही. कामठी आणि हिंगणा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तेथेही काँग्रेसने अतिक्रमण केले आहे. काटोलमध्ये ६० टक्के जागा देण्याचे ठरले आहे. मात्र, त्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. नागपूर शहरातही हीच परिस्थिती आहे. एकाही मतदारसंघात राष्ट्रवादीला ठरलेल्या सूत्रानुसार समित्या देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी याची लेखी तक्रार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सन्मानाने जागा दिल्या नाही तर महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमचे बघून घेऊन असे सांगून काँग्रेसला अनेकदा इशारा दिला आहे. राज्यात आम्ही मोठे भाऊ आहोत असेही वारंवार ते आपल्या भाषणातून सांगतात. शहरात विधानसभेच्या निवडणुकीत किमान एक मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी काँग्रेसला बाध्य केले जाईल, असेही त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. ते दूरच राहिले कार्यकर्त्यांना साध्या शासकीय समित्यासुद्धा काँग्रेस सोडायला तयार नाही.

ठरलेल्या सूत्रानुसार, राष्ट्रवादीला समित्या देण्यात आलेल्या नाहीत. काँग्रेसचे काही नेते देणार नाही असेही ठणकावतात. आमच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचालायच्या का? त्यामुळे आजच प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांकडे याची लेखी तक्रार केली आहे.
-बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
loading image
go to top