मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘गुजरात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Duneshwar Pethe

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘गुजरात’

नागपूर : आधीच विदर्भात उद्योजक यायला तयार नाहीत. टाटा यांनी एअर बसचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र. शिंदे-फडणवीस सरकारने तो गुजरातला दानात दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केला.

टाटाच्या प्रकल्पामुळे विदर्भातील हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला असता. टाटा आल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक छोटोमोठे उद्योजक मिहानमध्ये आले असते. विदर्भाचा औद्योगिक विकासाला चालना मिळाली असती.

शिंदे-फडणवीस सरकारने प्रकल्प गुजरातला दान दिला: दुनेश्वर पेठे

मात्र युती सरकारने त्यावर पाणी फेरले. मेट्रो रेल्वेचे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. समृद्धीचे कामही झाले आहे. राज्यातील मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये पळवले जात आहेत. मात्र मुख्यमंत्री व इतर मंत्री सणांचे फक्त इव्हेंट साजरे करण्यातच व्यस्त आहे. असा आरोपही यावेळी पेठे यांनी केला. पत्रकार परिषदेला पेठे यांच्यासह प्रशांत पवार, शैलेंद्र तिवारी, संतोषसिंग परिहार, जानबा मस्के आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी शिर्डीला मंथन करणार

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचे चार आणि पाच नोव्हेंबरला शिर्डी येथे मंथन शिबिर घेऊन भविष्याचा वेध घेणार आहे. वर्तमान स्थितीतील आकलन तसेच भविष्यातील आव्हानांचा वेध यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी शिबिरात अभ्यासवर्गही घेण्यात येणार आहे. शिबिरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.