Nagpur News : आठवडाभरात सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना! ; प्रारंभिक अधिसूचनेवरील हरकतींवर सुनावणी पूर्ण; थेट जमीन खरेदी होणार बंद

Nagpur Land Acquisition Projects : नवीन नागपूर प्रकल्पासाठी कलम १९ अंतर्गत भूसंपादनाची अधिसूचना पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. दरम्यान, तिसऱ्या रिंगरोडसाठी हिंगणा तालुक्यात सर्वाधिक सुमारे एक हजार एकर जमीन संपादित होणार आहे.
Land acquisition advances for Nagpur’s new development and third ring road projects

Land acquisition advances for Nagpur’s new development and third ring road projects

esakal

Updated on: 

नागपूर: नवीन नागपूर प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग आला असून, पुढील आठवड्यात कायद्यानुसार भूसंपादनासाठीची कलम १९ अंतर्गत (सक्तीचे भूसंपादन) अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

प्रारंभिक अधिसूचनेवर प्राप्त झालेल्या सुमारे ५० ते ६० हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. संबंधित हरकतींवर लेखी उत्तर दिल्यानंतर पुढील अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. नागपूर हे ‘आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र’ (आयबीएफसी) म्हणून विकसित होणार आहे. हिंगणा तालुक्यातील मौजा गोधनी (रिठी) आणि लाडगाव (रिठी) येथे सुमारे १ हजार ७१० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प आहे.

Loading content, please wait...