esakal | विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात न पाठवता हटके पद्धतीने केले मूल्यांकन, नागपुरातील शाळेचा प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

student

विद्यार्थ्यांचे हटके पद्धतीने केले मूल्यांकन, नागपुरातील शाळेचा प्रयोग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना वरचा वर्गात ‘प्रमोट' (student promote to upper class) करण्याचे आदेश सरकारने काढले. त्यामुळे नाइलाजाने जवळपास सर्वच शाळांनीही तीच भूमिका बजावली. मात्र, यापेक्षा वेगळी वाट धरीत काँग्रेसनगरातील न्यू इंग्लिश हायस्कूलचा (new english high school nagpur) पूर्व माध्यमिक विभागाने नेहमीच्या पाठांतरावर आधारित मूल्यांकनाला फाटा देत अभिनव उपक्रमांवरून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मूल्यांकन (online evaluation by student) केल्याचे समोर आले आहे. (nagpur new english high school promote student to upper class by online evaluation)

हेही वाचा: तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

घोकंपट्टीऐवजी न्यू इंग्लिश हायस्कूलचा पूर्व माध्यमिक विभागाद्वारे विविध उपक्रमांवर आधारित विषयनिहाय मूल्यांकन करण्यात आले. यात पावर पॉइंट प्रेझेंटेशन, कथाकथन, कोडी ,कविता-गाणी, प्रकल्प प्रस्तुतीकरण इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला. याशिवाय आपली संस्कृती, सद्य परिस्थिती, आपला उज्वल इतिहास या गोष्टींची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा या हेतूने काही स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत परीक्षा दिल्याचे जाणवलेही नाही.

गणित विषयाची तपासली क्षमता

शाळेकडून २६ ते ३१ मे यादरम्यान गणित विषयांतर्गत येणाऱ्या सर्व क्षमतांच्या विकासाचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात ५ ते ७ या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी १ ते २५ पर्यंत पाढे पाठांतर करणे, १ ते ५० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठांतर, विविध भूमितिय आकारांची ओळख, भौमितिक सूत्रे, गणिताच्या काही मूलभूत संकल्पना या सर्व घटकांचा दैनंदिन व्यवहारात होणारा उपयोग यावर आधारित प्रश्नमंजूषा, मॅथक्राफ्ट, व प्रकल्प निर्मिती घेण्यात आले. याशिवाय घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून प्रकल्प निर्मिती केली. त्यात ६० विद्यार्थ्यांचे प्रकल्प तयार करण्यात आले. त्यापैकी अंतिम फेरीसाठी १५ प्रकल्पाची निवड घेण्यात आली. त्याचे परीक्षण राजेंद्र चौधरी (वर्धा), आण्णाप्पा रावसाहेब परीट (कोल्हापूर) यांनी केले. त्यात इयत्ता पाचवी आणि सहावीतून राणी चव्हाण (प्रथम), पीयूष गायधने (द्वितीय), सम्यक वैरागडे, आर्या नेवारे (तृतीय) तर सातव्या वर्गातून निधी बोडे (प्रथम), अक्षदा ढेंगरे, अथर्व वैरागडे (द्वितीय) विजयी झाले.