esakal | तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग
sakal

बोलून बातमी शोधा

तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : ‘दहा सकारात्मक गोष्टींसोबत दोन नकारात्मक गोष्टी देखील आपसूकच येतात’, अशी म्हण आहे. याचाच प्रत्यय विवाह नोंदणी (Marriage registration) दरम्यान येतो. मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ झाल्यानंतर कायद्यांन्वये लग्न करण्यासाठी ती सुजाण ठरतात. हा नियम समाजातील प्रत्येकाच्या डोक्यात गोंदविला गेला आहे. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेले जोडपी याचा फायदा घेत विवाह बंधनात अडकतात. अर्थातच पालकांना याची कल्पना न देता. जवळपास दररोज अशा पद्धतीने लग्न होतात. (Young-people-get-married-without-parents)

पहिली घटना

सोशल मिडियाच्या माध्यमातून रिया आणि संकर्षणची (बदललेले नाव) ओळख झाली. एकमेकांवर विश्‍वास संपादन झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. कोवळ्या वयात जडलेले आकर्षण आणि घरचे लग्नाची परवानगी देणार नाही, असा कयास धरत रिया आणि संकर्षण यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या पालकांना न सांगता विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केली. मित्र मंडळींना साक्षीदार करीत रीतसर लग्न झाले. मात्र, काही दिवसात नात्यात कटुता आल्यानंतर काडीमोड घेण्यासाठी संकर्षण याने पुन्हा वकिलाला गाठले.

हेही वाचा: मनपात साडेचार कोटींचा कोविड घोटाळा; आभा पांडे यांचा आरोप

दुसरी घटना

परराज्यात राहणाऱ्या किसन व रीमा (बदललेले नाव) नोकरीच्या निमित्ताने शहरामध्ये आले. एका खासगी कंपनीमध्ये काम करताना एकमेकांची ओळख झाली. एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण झाल्यानंतर कीसनने रीमाला लीव्हइनमध्ये राहण्याचा प्रस्ताव दिला. रीमाने काही दिवस आढेवेढे घेतल्यानंतर तो मान्य केला. कीसनने घराची शोधाशोध सुरु केली. मात्र, जोडपी पाहून कोणी त्यांना कोणी रूम दिल्या नाहीत. मित्राने नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचे एक दिवस किसनला कळले आणि लिव्हइनमध्ये राहण्यासाठी हाच उपाय कीसनने शोधला. नोंदणी करीत किसन आणि रीमाने लग्न केले आणि राहण्यासाठी घर मिळविले.

बस्स तुम्ही फक्त पैसे द्या

लग्न करायचे आहे? बस्स.. दोन हार, मंगळसूत्र आणि सात हजार रुपये द्या.. बाकी आम्ही बघतो. पालकांना संभ्रमात ठेवत लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी या अन्‌ अशा चार-पाच संस्था शहरामध्ये समाजसेवा (?) करीत लग्न लावून देत आहेत. लग्न लावून दिल्यानंतर महापालिकेमध्ये नोंदणी करण्यासाठी लागणारे फोटो, प्रमाणपत्र आदी बाबी या संस्था पुरवितात. कायद्याने या प्रकारचे लग्न वैध मानल्या जाते. बाहेर गावचे अनेक जोडपी पळून येत शहरामध्ये या पद्धतीने लग्न करतात.

हेही वाचा: यवतमाळमध्ये आणखी दोघांचा वीज पडल्याने मृत्यू

घरमालकाने घर भाड्याने देताना कायदेशीर बाबी पूर्ण करायला हव्या. तर, पालकांनी आपल्या पाल्यांचे लग्न लावून देताना वधु-वराची पूर्ण चौकशी करायला हवी. भूतकाळात अशा घटना घडल्या असल्यास भविष्यामध्ये त्या डोकेदुखी ठरु शकतात.
- ॲड. अनिल कावरे

(Young-people-get-married-without-parents)