
नागपूर : सलामुल्लाच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ
नागपूर : महिलेल्या तीन वर्षांपूर्वी तीन लाखात बाळाची विकणाऱ्या मुख्य सुत्रधार सलामुल्ला खान (वय ६२) याच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शनिवारी गुन्हे शाखा पोलिसांनी दुपारी रिमांड कोर्टात सादर केले होते. अटकेत असलेली महिला आणि दोन परिचारिका या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान आता पोलिसांकडून त्याच्या कोंढाळी येथील बालसुधारगृह आणि गिट्टीखदान येथील विधवा महिला पूनवर्सन केंद्राचीही झडती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सलामुल्ला खान (वय ६२ रा. गिट्टीखदान) याने तीन वर्षांपूर्वी सुरेंद्रगड येथील ५५ वर्षीय महिलेला १० ते १२ दिवसाचे नवजात बाळ विकले होते. यामध्ये सलामुल्ला खान याच्यासह तीन वर्षांपूर्वी धंतोलीतील एका बड्या रुग्णालयातील दोन परिचारिका आणि बाळ खरेदी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. चौघांनाही शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे, सलामुल्ला खान याचे कोंढाळीला बालसुधारगृह असून गिट्टीखदान परिसरात विधवा महिला पुनर्वसन केंद्र होते. एका वर्षांपूर्वी ते बंद करण्यात आले. त्या माध्यमातून दाम्पत्यांना हेरून पैसे घेत बाळाची खरेदीविक्री करीत होता काय? याचाही शोध घेतला जात आहे. त्यातूनच आता पोलिसांद्वारे या दोन्ही संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय नवजात बाळ देण्याऱ्या ‘कारा सेंटर’ यामध्ये संस्था नोंदणीकृत होती. त्याचीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यातूनच पोलिसांनी शनिवारी त्याला रिमान्ड कोर्टासमोर सादर केले. कोर्टाने त्याची बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
Web Title: Nagpur Newborn Baby Sale Case Three Women In Custody For Five Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..