Ngpur News : सांभाळा, लेझर किरणे आंधळे करू शकतात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Ngpur News : सांभाळा, लेझर किरणे आंधळे करू शकतात!

नागपूर - गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझर लाइटमधून निघणाऱ्या किरणांचा डोळ्यावर परिणाम होऊन काही मुलांची दृष्टी कमजोर झाल्याचे पुढे आले. मात्र लेझर लाइट, डिस्को लाईटमधील किरणांमुळे उपराजधानीत रुग्ण आढळत आहेत. मेडिकलमध्येही अशा उत्सवादरम्यान पंधरा दिवसात एक किंवा दोन रुग्ण आढळतात. यामुळे नुसता अंधत्वाचाच धोका नाही, तर त्वचेच्या कॅन्सरची मोठी जोखीम असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

सूर्यग्रहण, लेझर लाइट, वेल्डिंग आणि लग्न सोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या आर्क लाईटमधील इन्फ्रारेड अल्ट्राव्हायोलेट रेज अर्थात किरणे धोकादायक आहेत. त्यांची गती अधिक असते. यामुळे थेट डोळ्यातील पडद्याशी संपर्क आला की, मध्यम आणि उच्च-शक्तीचे लेझर किरणे डोळ्यातील पडदा किंवा त्वचा देखील बर्न करू शकतात. केवळ सण उत्सवादरम्यान अशा घटना दिसून येतात. किरणांमुळे डोळ्यांना इजा झालेले रुग्ण मेडिकलमध्ये अनेकदा आले आहेत. सुरुवातीला डोळे चुरचुरू लागतात.

डोळे चोळण्याची इच्छा होते, आणि डोळे चोळले की, त्यातून रक्तस्राव होतो. विशेषतः तरुण रुग्ण येत असल्याची माहिती माजी नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली.

ते ५ ते १० सेकंदही घातक

लेझर अपघातांचा धोका कमी

करण्यासाठी लेझरची सुरक्षित रचना,

वापर आणि अंमलबजावणी करणे

आवश्यक आहे.

मध्यम आणि उच्च-शक्तीचे लेझर धोकादायक असतात. लेझर वापरताना लेझर सुरक्षा गॉगल घालणे आवश्यक आहे.अमेरिकन राष्ट्रीय मानक संस्थेच्या वतीने लेझर वापरण्यासंदर्भात नियमही जारी केले आहेत. सण उत्सव असो की, लग्नाची वरात यात लेझर लाइट, आर्क लाइट वापरतात, हे लाइट वापरताना यावर कोणतेही आवरण नसते, ही मोठी जोखीम आहे. या वापरावर कायद्याने बंदी असावी, असे आग्रही मत यावेळी डॉ. मदान यांनी व्यक्त केले.

लेझर लाइटच्या किरणांमुळे ही जोखीम

रेटिनाच्या पेशींवर आघात होतो

डोळ्यातील पडदा गरम होतो

डोळे ड्राय होतात

अंधत्वाचा धोका असतो

त्वचेतील पेशी नुकसान होते.

तात्पुरत्या वेदना होणे

ब्लिस्टर अथवा लाली चढणे

त्वचेचा रंग बदलतो

क्वचित प्रसंगी व्रण राहतात

सुरक्षित लेझर उपचार हा कुठल्या अवयवावर व कोणत्या प्रकारचा लेझर किरण वापरतो त्यावर अवलंबून असते. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. अशावेळी उपचार करताना लेझरमधील हार्मफुल लाइट फिल्टर केले जातात. यामुळे घातक किरणांपासून बचाव होतो. सूर्यग्रहण बघतानाही संरक्षणात्मक विशेष गॉगल वापरतात.

डॉ. अशोक मदान, माजी नेत्ररोग विभागप्रमुख, मेडिकल.