Nagpur News : फार्म हाऊसवर पार्टीत अश्‍लील नृत्य ; पाचगाव शिवारात पोलिसांचा छापा १३ महिलांसह २३ पुरुषांना केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur News : फार्म हाऊसवर पार्टीत अश्‍लील नृत्य ; पाचगाव शिवारात पोलिसांचा छापा १३ महिलांसह २३ पुरुषांना केली अटक

नागपूर - काही महिन्यांपूर्वी फार्म हाऊसवर पार्टी करीत, अश्‍लील कृत्य करणाऱ्यावर कारवाई झाली होती. आता पुन्हा रविवारी रात्री पाचगाव येथील एका फार्महाऊसवर दारू पार्टी करीत अश्‍लील नृत्य करणाऱ्या २३ पुरुषांसह १३ महिलांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आणि रोखही जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव परिसरात अभ्यंकरनगर येथील ठाकरे नामक व्यक्तीचा ‘सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्ट’ नावाचे फार्महाऊस आहे. ते चालविण्यासाठी नागपुरातील राजबापू मुथईया दुर्गे यांनी घेतला होता. दरम्यान या ठिकाणी सातत्याने सुटीच्या दिवशी दारू पार्टी आणि अश्‍लील नृत्य केले जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.

त्यातून रविवारी (ता.१) मध्यरात्री पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्त्वात छापा टाकला. यावेळी काही पुरूष दारुच्या नशेत महिलांसोबत झिंगत असल्याचे आढळून आले.

त्यातून पोलिसांनी भाड्याने चालविणारा दुर्गे याच्यासह व्यवस्थापक विपीन यशवंत अलोणे (रा. जगनाडे चौक) आणि त्यांच्यासाठी मुलींची सोय करणाऱ्या भुपेंद्र ऊर्फ मॉन्टी सुरेश अणे (रा.रामटेक) २४ जणांना अटक केली. याशिवाय १३ मुलींना ताब्यात घेतले.

याशिवाय दारूचा साठा आणि कार व संगीताचे साहित्य जप्त केले.

असे आहेत आरोपी

अभय वेंकटेश सकांडे (रा वर्धा), अतुल ज्ञानेश्वर चापले (रा. मोठी अंजी वर्धा), शुभम ओमप्रकाश पवणीकर (रा. जुनी मंगळवारी), विशाल माणिकराव वाणी (रा. जुनोना वर्धा), आशिष नथुजी सकांडे (रा. गांधीनगर वर्धा), हर्षल भाऊराव माळवे (रा. मानस मंदिर, वर्धा), विजय सदाशिव मेश्राम(रा. तीगाव.वर्धा), प्रवीण महादेवराव पाटील (रा. मसाळा, वर्धा), अशोक तुकाराम चापडे (रा. गजानननगरी, सेलू,वर्धा), कौसर अली लियाकत अली सईद (रा केळझर,वर्धा), प्रशांत ज्ञानेश्वर घोगडे (रा. जुनापाणी,वर्धा), प्रवीण रामभाऊ बिडकर (रा. रोठा, वर्धा), सतीश उद्धवराव वाटकर (रा. हिंगणी वर्धा),

गजानन रामदास घोरे (रा. पिंपळगाव, बाळापूर, अकोला), महेश महादेव मेश्राम (रा. झडशी,वर्धा), गोविंद जेठालाल जोतवांनी (रा. साईमंदिर, वर्धा), राकेश विठ्ठलराव भांढेकर (रा. खापरीवॉर्ड २, वर्धा), अविनाश शंकरराव पंधरा (बोरखेडीकला, वर्धा), आकाश किसनाजी पिंपळे (रा. झडशी, वर्धा), राजेश रमेश शर्मा (रा. दयाळनगर, अमरावती), संजय सत्तणारायन राठी (रा. प्रतापनगर वर्धा)

औषधविक्रीचे टार्गेट पूर्ण केल्याने पार्टी

ग्रामीण पोलिसांनी अटक केलेले २४ जण हे वर्धा आणि इतर जिल्ह्यात कृषी केंद्र चालवितात. पावसाळ्यात शेतकऱ्यांना खत आणि फवारणीसाठी औषध विक्रीसाठी केंद्र मालकांना टार्गेट देण्यात आले होते. ते पूर्ण केल्यानंतर औषध व खते विक्री करणाऱ्या कंपनीने या पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान यासाठी भाड्याने फार्महाऊस चालविणाऱ्या राजबापू मुथईया दुर्गे यांना मोंटूने संपर्क केला. त्यातून या भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले. यासाठी युवतीही मोंटूनेच उपलब्ध करून दिल्यात.