Nagpur News : मोबाईन न दिल्याने मुलाने घेतला गळफास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur News : मोबाईन न दिल्याने मुलाने घेतला गळफास

नागपूर - बहिणीने खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून अकरावर्षीय मुलाने दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिगडोह ग्रामपंचायत परिसरात घडली. या प्रकाराने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हंसराज कृष्णकांत राय असे मृतक बालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसराजचे वडील मध्यप्रदेशात नोकरी करतात. आई शिला कृष्णकांत राय व त्याच्या दोन बहिणीसोबत तो पोलिसनगर येथे नाना छोटेलाल राय यांच्याकडे राहत होता. रविवारी( ता. १) सायंकाळी ५ वाजता बाहेर खेळून हंसराज घरी परतला. त्याचे नाना छोटेलाल राय हे पोलिसनगर येथे कार्यक्रमात गेले होते. आई शिला आपल्या एका मुलीसोबत काही कामानिमित्त बाहेर गेली होती. याशिवाय दुसरी मुलगी मोबाईलवर अभ्यास करत होती.

दरम्यान हंसराज बाहेरून घरी आला आणि त्याने बहिणीला खेळण्यासाठी मोबाईल मागितला. मात्र, तीने तो न देता, त्याला रागावले. त्यातून आतल्या खोलीत जाऊन हंसराजने पंख्याला दुपट्टा बांधून गळफास लावला. काही वेळाने त्याची बहिण या खोलीत गेली असता तो पंख्याला लटकलेल्या स्थितीत दिसला. तिने आरडाओरड केली आणि तात्काळ याची माहिती शेजारी व कुटुंबातील सदस्यांना दिली.

नातेवाईकांनी येऊन त्याला खाली उतरविले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. नेमक्या कोणत्या कारणाहून हंसराजने इतके टोकाचे पाऊल उचलले हे कळू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.