Kalidasa Sanskrit University Vice Chancellor Hariram Tripathi Dies in Road Accident : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचं रस्ते अपघातात निधन झालं आहे. आज पहाटेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. दोघेंही त्यांच्या उत्तर प्रदेशातील मुळ गावी म्हणजेच कुशीनगर जनपद मऊ येथे जात होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.