Swine Flu:साथरोगाने वाढवला ताप! नागपुरात डेंगीचे १३५४ रुग्ण, एकाचा मृत्यू; शहरात स्वाइन फ्लूचे ४९ रुग्ण, नऊ दगावले

उपराजधानीत सणासुदीच्या काळात डेंगीसह स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. शहरात डेंगीग्रस्तांची संख्या साडेआठशे व ग्रामीणमध्ये ४१५ झाली आहे.
Swine Flu:साथरोगाने वाढवला ताप! नागपुरात डेंगीचे १३५४ रुग्ण, एकाचा मृत्यू; शहरात स्वाइन फ्लूचे ४९ रुग्ण, नऊ दगावले

Nagpur News:उपराजधानीत सणासुदीच्या काळात डेंगीसह स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. शहरात डेंगीग्रस्तांची संख्या साडेआठशे व ग्रामीणमध्ये ४१५ झाली आहे. डेंगीच्या मृत्यूवर नियंत्रण आहे. तसेच स्वाइन फ्लुचे ४९ रुग्ण आढळले असून शहरात ९ जण दगावले आहेत.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा आपात्कालीन व्यवस्था तयार करीत नाही. खबरदारी घ्यावी असे आवाहन करते पण ‘ब्लू प्रिंट'' तयार करीत नाही. दिवाळी तोंडावर असताना डेंगीने महापालिकाच नव्हेतर आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. या काळात नागपूरकरांना तापासह खोकला आणि सर्दी आली आहे. सध्या हवेत गारवा असल्याने डेंगीची जोखीम वाढली आहे.

मात्र यावर्षी रुग्णसंख्या अधिक दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात पूर्व विदर्भात स्वाइन फ्लूचे १५ रुग्ण आढळले, त्यात ९ जण शहरातील आहेत. श्वासातून, खोकल्यातून, शिंकण्यातून स्वाइन फ्लूचा विषाणू दुसऱ्या माणसाला बाधित करतो, यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यावर्षी आजाराचा कहर

शहर - ९हजार ४०० नमुने -८३९ डेंगीचे रुग्ण - मृत्यू -०

ग्रामीण -३ हजार नमुने -४१५ डेंगीचे रुग्ण -०१

डेंगीची लक्षणे

-डोकेदुखी

-ताप येणे

-उकाडा वाढणे

-अतिशय घाम येणे

स्वाइन फ्लूची लक्षणे

-ताप

-खोकला

-स्नायू दुखणे

-डोके दुखणे

-नंतर श्वसनाचा आजार

-प्रसंगी न्युमोनिया

-श्वसन बंद पडणे(Latest Marathi News )

Swine Flu:साथरोगाने वाढवला ताप! नागपुरात डेंगीचे १३५४ रुग्ण, एकाचा मृत्यू; शहरात स्वाइन फ्लूचे ४९ रुग्ण, नऊ दगावले
Maratha Reservation : 'खरं बोलयाचं झालं तर...'; सरकारला दिलेल्या मुदतीबद्दल जरांगे स्पष्टच बोलले

नागपुर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.प्रवीण शिंगाडे म्हणाले की, " पाण्याची टाकी, घरातील कुलरची साठवलेले पाणी, वापर नसलेल्या विहिरी, खड्यात साचलेले पाणी यातून डासांचे प्रजनन होते. परिणामी डेंगी व इतर संसर्गरोगांचा धोका उद्‍भवतो. या बाबी नियंत्रित करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे साध्या फ्लूसारखीच आहेत. मात्र श्वसनाशी संबंधित असल्याने स्वाइन फ्लूची गुंतागुंत वाढते. स्वाइन फ्लूचा मृत्यूदर अधिक आहे." (Latest Marathi News )

Swine Flu:साथरोगाने वाढवला ताप! नागपुरात डेंगीचे १३५४ रुग्ण, एकाचा मृत्यू; शहरात स्वाइन फ्लूचे ४९ रुग्ण, नऊ दगावले
Maratha Reservation : 'खरं बोलयाचं झालं तर...'; सरकारला दिलेल्या मुदतीबद्दल जरांगे स्पष्टच बोलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com