
‘सुपर फॅमिली’ स्पर्धेमुळे अनेक कुटुंब बनणार ‘सुपर’
नागपूर : सकाळ वृत्तपत्र नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते, त्यामुळे प्रत्येकाला सकाळ आपला फॅमिली मेंबर आहे असे वाटते. आता नव्याने सुरु होत असलेल्या ''सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे निश्चितच वाचकांच्या ज्ञानात भर पडेल. सुपर फॅमिली प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे अनेक कुटुंब सुपर बनतील. सकाळच्या माध्यमातून सतत नवीन काहीतरी शिकायला मिळते. त्यामुळे नवीन काहीतरी करण्याची व वाचनाची ऊर्जा मिळते.
सकाळच्या विविध उपक्रमामुळे महिलांचे सुप्त गुण प्रकाशात येतात, त्यांना नवीन ओळख मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांसह सर्व कुटुंबियांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे सांगत कांचन गडकरी यांनी ''सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजुषा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२ चा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते गडकरींच्या निवासस्थानी शुभारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंबासाठी असून या अंतर्गत सकाळमध्ये रोज एक सदर प्रकाशित केले जाणार आहे. या सदरात कौटुंबिक मूल्य, गंमती, प्रेरक मजकुर, कोडी, कुटुंबाचे फोटो, रंजक माहिती, वाचक सहभाग, जनरल नॉलेज, सेलिब्रिटी सहभाग, सदरे, सेल्फी विथ फॅमिली, कुटुंब गोष्टी, गंमत गोष्टी, वाढवा जनरल नॉलेज, अंकज्ञान, चित्रकोडी, मूल्यमंत्र, खरेखुरे हिरोज, कार्टुन स्ट्रिप, साहित्य कोडे, शब्दखेळ अशा विविध माहितीचे ज्ञानभांडार १०० दिवसांसाठी १ जुलैपासून खुले होणार आहे.
या सदरावर आधारित रोज एक प्रश्न विचारण्यात येईल व त्या प्रश्नाचे उत्तर त्या सदरातच छापलेल्या कुपनवर लिहून १०० पैकी किमान ९० कुपन प्रवेशिकेवर चिकटवुन सकाळ कार्यालयात किंवा आपल्या शाळेत ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये जमा करावयाचे आहेत. सकाळच्या सुपर फॅमिली प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, जाहिरात मुख्य व्यवस्थापक सुधीर तापस, आणि वरिष्ठ व्यवस्थापक विजय वरफडे, सहाय्यक व्यवस्थापक रुपेश मेश्राम, वितरण प्रतिनिधी शुभम काथवटे, विजय चरडे उपस्थित होते.
अशी आहेत बक्षीसे
ही स्पर्धा जिंकणाऱ्यांना अनेक बक्षीसे मिळणार असून त्यामध्ये बंपर बक्षीस लॅपटॉप, पहिले बक्षीस गिअर सायकल, दुसरे फिटनेस बॅन्ड, तिसरे डिनर सेट, चौथे स्कॉलरशिप आणि विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला १००० रुपयाच्या स्कुलबॅगचे हमखास बक्षीस मिळणार आहे.
Web Title: Nagpur Nitin Gadkari Kanchan Gadkari Launch Super Family Quiz Competition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..