
नागपूर : गेल्या काही दिवसांत बाधितांचा (Corona patients) आलेख खाली आला. परंतु यापेक्षाही खाली आणण्यासाठी महापालिकेची (Nagpur NMC) धडपड सुरू झाल्याचे चित्र आहे. चाचण्यांच्याही संख्येत (Corona Testing near me) घट झाली असून त्या वाढविण्यासाठीही विविध उपक्रम राबविले जात आहे. ( Nagpur Nmc is trying to increase corona testings)
मेच्या पहिल्या आठवड्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी १८ होती, मागील आठवड्यात १० ते १६ मे या काळात ही टक्केवारी १४ पर्यंत खाली आली. ही टक्केवारी यापेक्षाही खाली आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले आहे. यासाठी महापालिकेने चाचण्या वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसांत विविध उपाययोजना केल्या आहेत. महापालिकेने यापूर्वी पोलिसांसोबत रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या तत्काळ चाचण्या केल्या. आता शनिवारपासून सुपर स्प्रेडरच्या चाचण्यांवर भर दिली.
शहरातील दुकानदार, भाजीपाला विक्रेते, बॅंकेतील अधिकारी, खासगी व शासकीय कार्यातील अधिकारी, कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते यांची सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत चाचण्या करण्यात येत आहे. याशिवाय ११ फिरत्या चाचणी केंद्राचीही सुविधा करण्यात आली आहे. फिरत्या चाचणी केंद्राद्वारे एखाद्या भागात जाऊन नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चाचण्यांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चाचण्या करून त्यांचे योग्यवेळी निदान व उपचार करता यावे, या हेतून महापालिकेने ही मोहिम सुरू केली.
आतापर्यंत शहरात एकूण १८ लाख ४८ हजार ७०७ नागरिकांनी चाचण्या केल्या आहेत. यात बाधितांची संख्या ३ लाख २६ हजार २४४ असून ही टक्केवारी १७ टक्के आहे. गेल्या काही दिवसांत ही टक्केवारी कमी झाली. चाचण्यातून बाधितांचा आलेख खाली येण्याचा साक्षात्कार आता पुन्हा महापालिकेला झाला. त्यामुळे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या आठ हजार नागरिकांची चाचणी
अत्यावश्यक कामाशिवाय फिरणाऱ्या ७९१४ नागरिकांची महिनाभरात कोरोना ॲंटीजेन चाचणी करण्यात आली. यातील २३८ जण बाधित निघाले. महापालिकेने पोलिसांसोबत संयुक्तरित्या ही मोहिम राबविली होती. कोरोना बाधितांना तत्काळ घरी जाऊन डॉक्टर्स सोबत संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आला होता. अद्यापही ही मोहिम सुरु आहे.
( Nagpur Nmc is trying to increase corona testings)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.