Nagpur News: हॉटेलच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादातून गुंडाकडून १० लाखांची खंडणी आणि खून करण्याची धमकी
Nagpur Crime: हॉटेलच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादातून गुंड गोट्या मोहितेने हॉटेल मालकाकडे १० लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास खून करण्याची धमकी दिल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
नागपूर : हॉटेलच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादातून कुख्यात गुंडाने हॉटेल मालकाला चक्क १० लाखांची खंडणी मागून खून करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी त्याच्यासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली.