
नागपूर : डॉक्टरकडून नर्सचे लैंगिक शोषण
नागपूर : प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्नाचे वचन दिले. लग्न करणार असल्याने प्रेयसीचा विश्वास बसला. याचा गैरफायदा घेऊन प्रेयसीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यानंतर लग्नास नकार देऊन २० लाखाची मागणी खंडणी मागितली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा नोंदविला आहे. प्रियकर हा डॉक्टर तर पीडित महिला ही नर्स आहे. नागेंद्र रामायणप्रसाद पटेल (३५) रा. लोही, पो. भिटा, त. गुरह, रिवा, मध्य प्रदेश असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. हा प्रकार अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार, पीडिता ही ४१ वर्षाची आहे. आठ वर्षापूर्वी ती एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करीत होती. त्यावेळी आरोपी नागेंद्र हा मेडिकलमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. पीडिता ज्या रुग्णालयात काम करायची तेथे नागेंद्रचे मित्र इंटर्नशिप करीत होते. मित्राला भेटण्यासाठी नागेंद्रचे पीडिताच्या रुग्णालयात जाणे-येणे होते. दरम्यान दोघांमध्ये संपर्क वाढला.
नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एमडी झाल्यानंतर लग्न करू, असे आश्वासन दिले. दरम्यान त्याने पीडिताशी लग्न करण्याच्या नावावर अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तो बंगलोर येथे एमडीचे शिक्षण घेण्यासाठी गेला. या दरम्यान दोघेही संपर्कात होते. एमडीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नागेंद्र आपल्या गावी गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या सोबत लग्न करेल या विश्वासात रमणारी पीडिताला त्याने लग्नास नकार दिला. ती त्याच्या गावाला जाब विचारण्यासाठी गेली. त्याने तेव्हाही नकार दिला. लग्नासाठी त्याने २० लाख रुपये मागितले.
नागेंद्रने विश्वासघात केल्याने तिने अजनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Web Title: Nagpur Nurse Sexually Abused By Doctor 20 Lakh Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..