Nagpur: निर्यातशुल्क वाढल्याने नागपुरी संत्र्याचे दर कोसळले; निर्यात बंदीचा फटका, राजस्थानमधील उत्पादनचाही होतोय परिणाम

राजस्थानमधील संत्री बाजारपेठेत दाखल झाली आहे. तसेच बांगलादेशाने निर्यातशुल्क वाढल्याने बाजारात संत्र्याच्या दरात विक्रमी घट झालेली आहे.
Orange Price
Orange PriceEsakal

Nagpur Oranges Price Dropped: राजस्थानमधील संत्री बाजारपेठेत दाखल झाली आहे. तसेच बांगलादेशाने निर्यातशुल्क वाढल्याने बाजारात संत्र्याच्या दरात विक्रमी घट झालेली आहे. मागील वर्षी २० ते ४० रुपये प्रतिकिलो असलेल्या संत्र्यांचे दर १५ ते ३० रुपये किलोवर आलेले आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील संत्र्यावर डासांचा प्रादुर्भाव झाल्यानेही सत्र्यांची गुणवत्ताही घसरली आहे.

स्थानिक बाजारपेठांमध्ये मागणी कमी आणि इतर राज्यातून संत्र्याची आवक वाढलेली असल्याने अनेक राज्यातून मागणी कमी झालेली आहे. मागील आठवड्यात दोन ते तीन दिवस सलग पावसाचे वातावरण होते. त्यामुळे संत्रा बागायतदरांची झोप उडाली. तोडणीला आलेल्या बागांचे वादळाने बऱ्याच ठिकाणी मोठे नुकसानही झाले आहे. परिणामी, संत्र्याच्या गुणवत्तेत व दरात घसरण झाली आहे.

नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या काटोल, कळमेश्वर, मोहपा, कोंढाळीसह विदर्भातील इतरही ठिकाणांवरून संत्र्याची आवक सुरू आहे. दररोज १५० ते २०० गाड्यामधून संत्र्यांची आवक होत आहे. आवक अधिक आणि मागणी कमी असल्याने भावात घसरण झालेली आहे. ही विक्रमी घसरण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सलग दुसऱ्या वर्षी संत्र्याचे दर घटल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी बागांचे सौदे सोडून दिले असून अॅडव्हान्स परत मागत असल्याची स्थिती ग्रामीण भागात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.(Latest Marathi News)

दर घसरण्याची कारणे

निर्यातबंदी, व्यापाऱ्यांनी मोडलेले सौदे, पडलेले दर अन वादळाचा तडाखा

जुलै, ऑगस्टमध्ये सौद्यात ठरल्यानुसार व्यापाऱ्यांकडून दर देण्यास नकार

व्यापारी दिलेली आगाऊ रक्कमही मागू लागले परत

आधी ९०० रुपये ठरलेल्या क्रेटची ३०० रुपयांना मागणी

बांगलादेशातील निर्यात बंदीचा फटका

राजस्थानमध्ये संत्र्याचे उत्पादन चांगले झाल्याने तेथील संत्र्याला मागणी वाढली

राजस्थानमध्ये संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यातील संत्र्याला अवकाळी पावसामुळे फटका बसला असून डासांच्या प्रादुर्भावामुळे गुणवत्ता खालावली आहे. परिणामी, इतर राज्यातून राजस्थानच्या संत्र्याला मागणी वाढली आहे. स्थानिक बाजारात संत्री विक्रीसाठी आले असले, तरी वरून चांगली दिसणारी संत्री तत्काळ सडू लागला आहेत. त्यामुळे विदर्भातील संत्र्यांची मागणी कमी झाली आहे. भावात विक्रमी घट झालेली आहे.-आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रुट अडतिया असोसिएशन (Latest Marathi News)

Orange Price
Miss World 2024: चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली 'मिस वर्ल्ड'; थाटात पार पडली स्पर्धेची अंतिम फेरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com