Nagpur Leopard: पारडी परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ; गस्त मोहीम सुरू, अस्तित्व नसल्याचा वन विभागाचा दावा
Leopard Sighting Causes Alert in Nagpur’s Pardi Area:शहरातील पारडी परिसरात सोमवारी दुपारी बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी हेल्पलाइनवर दिल्यानंतर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नागपूर : शहरातील पारडी परिसरात सोमवारी दुपारी बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी हेल्पलाइनवर दिल्यानंतर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्ता पार करून भिंतीवरून उडी मारून बिबट्या पळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.