

Nagpur Female Police Officer Accused of Bribery
Sakal
नागपूर : जलद गती विशेष न्यायालयात (पोक्सो) आरोपीच्या जामिनावर सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षकांनी साक्षीदाराला धमकावत लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. घटनेची माहिती न्यायालयाला देण्यात आल्यानंतर या महिला अधिकाऱ्यांना न्यायालयाने ताब्यात घेण्याचे आदेश देत कायदेशीर कारवाई करण्याचे नमूद केले. या गंभीर घटनेमुळे पोलिस दलासह विधी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.