Nagpur: कपिलनगरातील लॉटरी सेंटरवर छापा; नऊ जणांना अटक, पोलिस उपायुक्ताच्या पथकाची कारवाई

पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राज लॉटरी सेंटरमध्ये शनिवारी सायंकळच्या सुमारास छापा टाकला.
Nagpur: कपिलनगरातील लॉटरी सेंटरवर छापा;
नऊ जणांना अटक, पोलिस उपायुक्ताच्या पथकाची कारवाई

Kapilanagar Lottery Centre Raid: पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राज लॉटरी सेंटरमध्ये शनिवारी सायंकळच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पथकाने नऊ जणांना अटक केली असून दीड लाखाचा माल जप्त केला.

राकेश रावत, आकाश नारनवरे, राकेश डोंगरे, सुरेश नेवारे, अनिल शिरसीकर, गोमलाल यादव, आवेश लोखंडे व वसंत देवगिरीकर याला ताब्यात घेतले. राजेश नंदनवार हा पसार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाला या ठिकाणी मोठ्याप्रमाणत मटका सुरू असून या सेंटरमधून ऑनलाइन जुगारही खेळल्या जात असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी नऊ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांना अटक करीत, १८ हजार ५०० रुपयांची रोख, सात मोबाइलसह दीड लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. (Latest Marathi news)

Nagpur: कपिलनगरातील लॉटरी सेंटरवर छापा;
नऊ जणांना अटक, पोलिस उपायुक्ताच्या पथकाची कारवाई
Ashok Chavan Resign: अशोक चव्हाणांनी का दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा?, स्वतः सांगितलं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com