कोट्यवधी रूपयांची सट्टेबाजी करणाऱ्या सात मोठ्या बुकींना अटक; नागपूर शहर पोलिस आयुक्तांनी घेतली परेड

nagpur police arrested Bookies who betting in IPL nagpur police arrested Bookies who betting in IPL
nagpur police arrested Bookies who betting in IPL nagpur police arrested Bookies who betting in IPL

नागपूर : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हिटलिस्टवर आता शहरातील क्रिकेट बुकी आले आहेत. आयपीएलवर कोट्यवधी रूपयांची सट्टेबाजी करणाऱ्या सात मोठ्या क्रिकेट बुकींना पोलिसांच्या विशेष पथकाने छापा घालून अटक केली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३० सप्टेबरला लकडगंज पोलिसांनी पीयुष अग्रवाल नावाच्या क्रीकेट बुकीला अटक केली होती. त्याच्यासोबत असलेल्या दोन बुकींना लकडगंज पोलिसांनी पैसे घेऊन सोडले होते, अशी चर्चा होती.त्यामुळे पोलिस आयुक्तांनी स्वता लकडगंज पोलिस ठाण्याला भेट देऊन ठाणेदाराचा क्लास घेतला होता. 

आयपीएलवर शहरातून कोट्यवधीची सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली होती. त्यामुळे आयुक्तांनी क्रीकेट बुकींचे रॅकेट उध्द्वस्त करण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते. सोमवारी सुरू असलेल्या बंगळूरू विरूध्द कोलकाता दरम्यान सुरू असलेल्या आयपीएस मॅचवर सट्टेबाजी खेळणाऱ्या सात क्रीकेट बुकींवर पोलिस पथकाने छापा घातला. 

या छाप्यात संजय उर्फ छोटू गौरीशंकर अग्रवाल (रामदापेठ, नुकवन अपार्टमेंट, प्लॉट क्र.३०१), प्रशांत बाळकृष्ण शहा (नेताजीनगर, कळमना), अभिषेक निलम लुनावत (ईतवारी, बापूराव गल्ली), शंकरलाल देवीप्रसाद कक्कड (गरोबा मैदान, लकडगंज), जितेंद्र रामचंद कमलानी (रामदारपेठ, नुकवन अपार्टमेंट), शैलेश श्‍यामसुंदर लखोटीया (गरोबा मैदान, दादा धुनिवाले चौक) आणि पंकज मोहनलाल वाधवाणी (वसंतशाह चौक, जरीपटका) यांना अटक करण्यात आली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काही मुख्य क्रिकेट बुकींना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केल्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलिस आयुक्त (उत्‍तर विभाग) यांच्या कार्यालयात बसवून ठेवण्यात आले होते. त्यांची आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी स्वतः चौकशी केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

रमूचा शोध सुरू

शहरात रिंकू अग्रवाल व रमू अग्रवाल हे मोठे क्रिकेट बुकी आहेत. फिरोज, तन्ना आदी क्रिकेट बुकी त्यांचे खास असून ते शहराबाहेर असल्याने सापडले नाहीत. याच गुन्ह्यात त्यांचाही शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी निवडक पत्रकारांशी बोलताना दिली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com