esakal | बिअरच्या बाटलीवरील 'क्राऊन कॉर्क' अन् 'ओपनर'चा शोध लावणारी व्यक्ती आहे तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

william painter invented crown cork and opener

क्राऊन कॉर्क फक्त सोड्याच्या बाटल्यांनाच लावला जातो, असे नाही. तो बिअरच्या बाटल्यांना लावण्यासाठी देखील वापरला जातो. अमेरिका, इंग्लंडसारख्या थंड प्रदेशात बिअरची सर्वात जास्त गरज भासते. त्याकाळी त्यांना बिअर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे गरजेचे होते. पण, बिअर बाटलीबंदच राहून त्यामधील एअर लिक होण्याची भीती तर होतीच.

बिअरच्या बाटलीवरील 'क्राऊन कॉर्क' अन् 'ओपनर'चा शोध लावणारी व्यक्ती आहे तरी कोण?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर - पाण्यासारख्या साध्या द्रव पदार्थाची वाहतूक करणे अगदी सोपे असते. पण, जे द्रव पदार्थ उच्च दाबाखाली साठवून ठेवले जातात, त्याला व्यवस्थित सीलबंद करणे गरजेचे असते. सोड्यासारखे वायू असलेले पेय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे म्हटलं, तर मोठी समस्याच निर्माण व्हायची. कारण या पदार्थाला थोडी जागा मिळाली की 'फुस्ससस' होऊन त्यामधील वायू बाहेर निघून जातो. मग त्या पदार्थाची सगळी मज्जाच संपते. त्यामुळेच हा पदार्थ साठवण्यासाठी वापर होतो, तो क्राऊन कॉर्कचा. पण, इवलेसं दिसणाऱ्या क्राऊन कॉर्कचा इतका मोठा उपयोग असेल, असं आपल्याला नक्कीच वाटलं नसेल. पण, या लहानशा दिसणाऱ्या क्राऊन कॉर्कचा शोध कोणी लावला? हे आपल्याला माहिती आहे काय?

...असं तयार झालं पेटंट -
क्राऊन कॉर्क फक्त सोड्याच्या बाटल्यांनाच लावला जातो, असे नाही. तो बिअरच्या बाटल्यांना लावण्यासाठी देखील वापरला जातो. अमेरिका, इंग्लंडसारख्या थंड प्रदेशात बिअरची सर्वात जास्त गरज भासते. त्याकाळी त्यांना बिअर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे गरजेचे होते. पण, बिअर बाटलीबंदच राहून त्यामधील एअर लिक होण्याची भीती तर होतीच.  त्यासाठी अनेक संशोधकांनी पेटंट तयार केले होते. मात्र, कोणतीच कल्पना इतकी सोपी आणि व्यावहारीक नव्हती. त्यामुळे या बाटल्यांचा प्रश्न सुटणार नाही, असे वाटायला लागले, तर काहींनी मात्र बाटलीला लाकडी बूच लावून त्यावर सिलबंद करण्याचं सूचवलं. पण, ती कल्पना इतकी सहज सोपी नव्हती. पण, ही समस्या सोडवली विल्यम पेंटर नावाच्या एका व्यक्तीने. 

हेही वाचा - शिवसैनिक म्हणाले, 'ही' तर राणा दाम्पत्याची नौंटकी

विल्यम पेंटरचा जन्म -
विल्यम पेंटर यांचा जन्म २० नोव्हेंबर १८३८ ला आयर्लंड येथे झाला होता. वयाच्या २० व्या वर्षी ते करीअरसाठी अमेरिकेला गेले. ते मायर्लंड येथील बाल्टीमोर शहरात मुर्रील आणि केझर्स मशीनच्या दुकानात फोरमॅन म्हणून रुजू झाले. त्याठिकाणी ते काचेच्या बाटल्यांच्या वरच्या भागाचे डिझाईन तयार करायचे. बिअरच्या बाटल्या सीलबंद करण्यासाठी झाकणाचा शोध लावण्यासाठी पेटंट मागवणे सुरू असल्याचे विल्यम यांना समजले. त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि अगदी सोप्पा उपाय शोधला, तो म्हणजे क्राऊन कॉर्क. विल्यम पेंटरने १८९२मध्ये धातूच्या पत्र्यापासून एक बिल्ला तयार केला आणि त्याला गोल-गोल २४ दाते पाडले. बाटलीच्या वरच्या बाजूला घट्ट दाबून ठेवणारी टोपी, हे पेंटरच्या क्राऊन कॉर्कचे डिझाईन होते. त्यांच्या या क्राऊन कॉर्कच्या शोधामुळे आज बिअर बाटलीबंद राहू शकते. आपण थंड बिअरचा आनंद घेऊ शकतो, ते फक्त विल्यम पेंटर यांच्यामुळेच. 

हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे ६५४ स्त्रोत फ्लोराईडयुक्त, तर साडेआठशे पिण्यासाठी अयोग्य; नागरिकांचे...

क्राऊन कॉर्क अन् ओपनर -
आता देखील हे क्रॉऊन कॉर्क बिअर, सोडा, फिज, कोक यांसारखी पेय बाटलीबंद करण्यासाठी वापरला जातो. त्यात काहीच बदल झाला नाही. फक्त त्या काळात कॉर्कवर रंगीत छपाई करण्याचे यंत्र नव्हते. कालांतराने प्रगती होत गेली, तस-तसे आपआपल्या कंपनीच्या उत्पादनानुसार उत्पादक या कॉर्कवर डिझाईन काढत गेले. पण, फक्त हे क्राऊन कॉर्क तयार करून बिअर तर बाटलीबंद झाली होती. पण, तो क्राऊन कॉर्क उघडायचा कसा? हा देखील प्रश्नच होता. त्यासाठी एका वेगळ्या उपकरणाची गरज आहे, असे पेंटर यांनी सांगितले, ते म्हणजे ओपनर. हे क्राऊन कॉर्क आणि ओपनर या दोन्हीचे पेटंट विल्यम पेंटरला मिळाले. त्यामुळे बिअर पिताना विल्यम पेंटरची आठवण काढायला विसरू नका.

संकलन व संपादन  - भाग्यश्री राऊत

loading image