esakal | ऐशोआरामाचा हव्यास नडला, पतीच्या वाढदिवशीच पडल्या हातात बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur crime

ऐशोआरामाचा हव्यास नडला, पतीच्या वाढदिवशीच पडल्या हातात बेड्या

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : श्रीमंत बापाच्या घरात जन्मलेली शीतलला ऐशोआरामाच जीवन जगण्याची इच्छा होती. श्रीमंतीत वाढलेल्या मुलीचे केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या उपविभागीय अभियंतासोबत लग्न झाले. पती काटकसरी होती. त्यामुळे शीतलला पैशाची उधळण करता येत नव्हती. तिला फॅशन आणि लाईफस्टाईल मेंटेन ठेवण्यासाठी पैसा हवा होता. पतीला सव्वा लाख रुपये पगार होता. मात्र, तिला हवा तेवढा पैसा खर्च करण्यासाठी मिळत नसल्याने ती निराश राहत होती. त्यातूनच तिला डॉक्टर दांपत्याकडून १ कोटी रुपये कमाविण्याची कल्पना सुचली, अतिपैशाचा हव्यास तिला नडला आणि तिच्या पतीच्या वाढदिवशीच शितलच्या हातात पोलिसांनी बेड्या (nagpur crime news) ठोकल्या. (nagpur police arrested woman in kidnapping case)

हेही वाचा: हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल, तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार?

शीतल इटनकर हिला दोन महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. ती डॉ. तुषार आणि राजश्री पांडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. दोघांनीही शर्थीचे प्रयत्न करीत तिला कोरोनातून वाचवले. कोरोनाकाळात पांडे दाम्पत्याने चांगली कमाई केली, त्यामुळे तिच्या मनात डॉक्टरकडून एक कोटी रुपये खंडणी उकळण्याची आयडिया आली. दोन आठवड्यापूर्वीच तिने प्लान केला. डॉक्टरला दोन्ही मुलांच्या अपहरणाची धमकीचे पत्र पाठवून एक कोटी रुपये उकळण्याची तयारी केली.

फेसबुकने केला घोळ -

डॉ. तुषार आणि डॉ. राजश्री यांना फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची सवय आहे. त्यांनी मुलगा व मुलीचे अनेक फोटो अपलोड केले. ही बाब शितलच्या लक्षात आली. एका मुलाच्या जिवाची किंमत ५० लाख, अशी एक कोटी डॉक्टर सहज देऊ शकते, असा तिने विचार केला. १७ जूनला सायंकाळी एका ठिकाणी पैशाची बॅग आणायची. ती तेथे ठेवून मागे न पाहता निघून जायचे, पोलिसांना सांगितल्यास किंवा ट्रॅकर ठेवल्यास मुलांच्या जीवाला धोका असेल, असा उल्लेख धमकीच्या पत्रात केला होता.

पोलिसांनी आखला प्लान -

ठाणेदार विजय आकोत यांनी शीतलला रंगेहात पकडण्याचा प्लान केला. सांगितलेल्या ठिकाणी पैशाची बॅग ठेवायची. ती बॅग उचलण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रंगेहात अटक करायची. त्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांची तैनातीही नियुक्त केली होती. परंतु, गुरुवार उजाडण्यापूर्वीच शीतलला पोलिसांनी अटक केली.

loading image