Nagpur: अजनीच्या बीटमार्शलने वाचविला इसमाचा जीव, उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिस आयुक्तांकडून सत्कार

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३८ वर्षीय इसमाचे प्राण वाचविण्याचे काम गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शलने करीत संवेदनशिलतेची प्रचिती दिली.
अजनीच्या बीटमार्शलने वाचविला इसमाचा जीव, उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिस आयुक्तांकडून सत्कार
Nagpur Esakal

Police Constable Saved Life of Young Boy: अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३८ वर्षीय इसमाचे प्राण वाचविण्याचे काम गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शलने करीत संवेदनशिलतेची प्रचिती दिली. यावेळी त्याची समजूत काढून घरी रवानगी केली.

पोलिस कॉन्‍स्टेबर सुर्यकांत तिवारी आणि दीपक धांडे अशी बीटमार्शलची नावे आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक चामटे यांच्या मार्गदर्शनात अजनी रेल्वे क्वार्टरजवळ गस्तीवर असताना, दीपक धांडे यांना एक फोन आला. यावेळी त्यांना समोरून एक जण गळफास घेत, आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली.

लोकेशन बघून त्यांनी घर गाठले. यावेळी रवि सकरु बोडा (वय ३८) हा इसम साडीने गळफास घेत असल्याचे आढळून आला. दार तोडून दोघांनीही आत प्रवेश करीत, त्याला वाचविले. बेकार असल्याने दारूच्या आहारी रवी गेला होता. त्यामुळे त्याची पत्नी आणि मुलगा त्याला सोडून गेले होते. दरम्यान तो आईकडे असलेल्या वडिलांच्या पेन्शनमधून पैशाची मागणी करायचा. मात्र, आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. (Latest Marathi News)

त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कॉन्‍स्टेबर सुर्यकांत तिवारी आणि दीपक धांडे यांच्या समयसुचकतेने त्याचे प्राण वाचले. ही माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना कळताच त्यांनी कार्यालयात बोलावून दोघांचाही प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करीत अभिनंदन केले.

अजनीच्या बीटमार्शलने वाचविला इसमाचा जीव, उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिस आयुक्तांकडून सत्कार
Navneet Rana: नवनीत राणा यांना मोठा दिलासा! निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com