Nagpur Police
sakal
नागपूर
Nagpur Police: दोन ड्रग्ज तस्करांकडून २१९ ग्रॅम एमडी जप्त; पोलिसांचा छापा, मुख्य आरोपीचा शोध सुरू
Crime News: नागपूर पोलिसांनी कारवाईत ३२ लाख ८५ हजार रुपये किमतीचे २१९ ग्रॅम एमडी जप्त करून दोन तस्करांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.
नागपूर : कळमना पोलिसांनी मंगळवारी (ता.१६) मिनिमातानगर परिसरात कारवाई करीत दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोतवाली हद्दीत छापा टाकून दोन एमडी तस्करांना अटक केली.