esakal | हत्या करण्याच्या तयारीत होता डझनभर गुन्ह्यांतील कुख्यात गुंड; वेळेवर पोहोचले पोलिस आणि टळला अनर्थ 
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Police caught Man who has many FIRs against him

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पाहुणे हा गुन्हेगारी जगतातील मोठा गुंड असून तो गेल्या २००७ पासून गुन्हेगारीत सक्रीय आहे. त्याच्यावर आतापर्यंत २० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

हत्या करण्याच्या तयारीत होता डझनभर गुन्ह्यांतील कुख्यात गुंड; वेळेवर पोहोचले पोलिस आणि टळला अनर्थ 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः जवळपास दोन डझनावर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड अज्जू उर्फ अजय प्रभाकर पाहूणे (४६, इमामवाडा झोपडपट्टी) याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली. तो कुणाचातरी गेम करण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच अज्जूला अटक केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पाहुणे हा गुन्हेगारी जगतातील मोठा गुंड असून तो गेल्या २००७ पासून गुन्हेगारीत सक्रीय आहे. त्याच्यावर आतापर्यंत २० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकण्याचा प्रयत्न, जुगार खेळणे, अवैध दारू विक्री करणे समाजिक शांतता भंग करून दहशत निर्माण करण्याचे खटले त्याच्यावर सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी युनिट चारचे अधिकारी टोळीयुद्ध होऊ नये म्हणून आरोपींचा शोध घेत होते. 

दरम्यान अजय हा हातात तलवार घेऊन एकाचा गेम करण्यासाठी जात असल्याची त्यांना माहिती मिळाली. पथकाने लगेच इमामवाडा झोपडपट्टीत सापळा रचून अजयला अटक केली. त्याच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त केली. ही कारवाई गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, विजय कसोधन, रमेश उमाठे, राजकुमार शर्मा, दिपक बोले, सचिन तुमसरे, सतीश ठाकरे, नरेंद्र बांते आणि अविनाश ठाकूर यांनी केली. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

गोलूला तलवारीसह अटक

कुख्यात गुंड गोलू उर्फ अरमान विजय मोगरे (२३, रा. कुंजीलालपेठ) हा बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास परदेशी मोहल्ल्यात तलवारीसह धामधूम करीत होता. माहिती मिळताच त्याला युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image