Couple: तोतया नव्हे तर खऱ्या पोलिसांनीच लुटले प्रेमीयुगुलाला, वाठोडामध्ये गुन्हा दाखल

POCSO: संदीप आणि पंकज यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आम्ही पोलिस आहोत असे सांगून धमकविण्यास सुरवात केली. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतही धमकावले.
Nagpur Police looted Couple
Nagpur Police looted CoupleEsakal
Updated on

नागपूर: वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत एका प्रेमी युगुलाला दोन तोतया पोलिस कर्मचाऱ्यांनी लुटून युवकाकडून सोनसाखळी हिसकाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ते खरोखरच पोलिस असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे दोन्ही कर्मचारी कळमना ठाण्यात काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

संदीप यादव आणि पंकज यादव (दोन्ही, रा. कळमना) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कळमना ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्चला रात्री नऊ वाजताच्या सुमारास १९ वर्षीय युवक हा वाठोडा पोलिस ठाणे हद्दीत, जबलपूर हायवे रोडवरील एफ.एल.डी हॉटेल समोर कारमध्ये बसून त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत होता. संदीप आणि पंकज यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आम्ही पोलिस आहोत असे सांगून धमकविण्यास सुरवात केली. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतही धमकावले. त्यानंतर तरूण-तरुणी घाबरले. त्याचा फायदा घेत, दोघांनीही युवकाच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली.

Nagpur Police looted Couple
Lok Sabha Poll 2024 : आकडेमोड सुरू, शक्यतांचा बाजार गरमागरम; लोकसभेतील सूज विधानसभेत उतरली ; मतदानाचा टक्का घसरला

याशिवाय ही बाब कुठेही सांगितल्यास त्याला बघून घेण्याची धमकी दिली आणि निघून गेले. दरम्यान युवकाने वाठोडा पोलिस ठाणे गाठून घटनेची हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडून तक्रार घेत, ३९२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत, तपासाला सुरवात केली. दरम्यान वाहन क्रमांक आणि तांत्रिक तपासातून ते दोघेही कळमना पोलिस ठाण्यात कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. त्या दिवशी ते कामावर होते. त्यांच्याकडे गस्तीचे काम नसताना ते त्या परिसरात कसे काय गेले? याबाबत खळबळ उडाली. विशेष म्हणजे, याची माहिती कळमना पोलिस ठाण्याला देण्यात आली. अद्याप दोघांनाही अटक करण्यात आली नसून पोलिस याप्रकरणी तपास करीत आहे. मात्र, पोलिसांकडूनच अशाप्रकारे गुन्हा घडत असल्यास सर्वसामान्य जनतेने कुणाकडे बघावे असा प्रश्‍न आता निर्माण होऊ लागला आहे.

Nagpur Police looted Couple
Thumb Transplant: तुटलेल्या अंगठ्याचे प्रत्यारोपण, मध्यप्रदेशातील तरुणाचे अपंगत्व टळले

असे घडल्यास थेट पोलिसांत करा तक्रार

पंकज व संदीप यादव हे दोघे रिंगरोडवर प्रेमीयुगुलाला लुटण्यात कुख्यात आहेत. या दोघांनी अनेकांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. पीडितांनी निर्भयपणे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे कार्यालयीन वेळेत थेट तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस विभागाकडून मागविली माहिती

कळमना पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांकडून प्रेमी युगुलाला लुटल्याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. कळमना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकूल महाजन यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांना विचारणा केली असता, त्यांनी त्याबाबत वाठोडा पोलिसांकडून माहिती मागविण्यात आल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com