
नागपूर : पोलिस दलात उल्लेखनीय कार्यासाठी नागपूरचे पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस महासंचालक प्रमोदकुमार शेवाळे, सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे, पोलिस उपनिरीक्षक अनिल कृष्णराव ब्राह्मणकार यांच्यासह नागपूर ग्रामीण पोलिस दलाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश ताजणे यांना गुरुवारी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.