
नागपूर : शहरातील कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुनी कामठी मार्गावरील उड्डाणपुलाजवळील शिवशक्ती बारमध्ये डान्सबार सुरू होता. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (ता.२०) मध्यरात्री छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी कारवाई करीत तीन पीडित महिलांची सुटका करीत, २५ जणांना अटक केली.