Nagpur Police Recruitment : पोलिस भरती केल्यास तिजोरीवर आर्थिक बोजा; गृह उपसचिव, उपसचिवांसह अतिरिक्त सचिवांना अवमान नोटीस
High Court Nagpur : नागपूर पोलिस दलातील रिक्त पदे न भरल्यामुळे उच्च न्यायालयाने गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना अवमानाची नोटीस बजावली. वित्त विभागाच्या कार्यपद्धतीवरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
नागपूर : पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांनी नागपूर शहर, ग्रामीण पोलिस दलात अधिक मनुष्यबळाची गरजेचे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बोलून दाखविले.