

SBL Company Owner Among Accused In Blast Probe
Esakal
SBL Company Owner Among Accused In Blast Probe: नागपुरातील राऊळगाव इथं एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटात १८ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून कंपनीच्या मालकासह २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात प्रोडक्शन मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर यांचा समावेश आहे.