

Nagpur Marble House fake partnership fraud
sakal
नागपूर : इतवारी येथील सराफा बाजार परिसरातील मार्बल हाऊस इमारतीतील दुकानाचे बनावट कागदपत्र तयार करून बेकायदेशीररीत्या ताबा मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमर हर्षद शाह (रा. लकडगंज, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तहसील पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.