
नागपूर : गणेशपेठ पोलिसांनी रस्ते अपघातातील पीडित व्यक्तीची बॅग त्याच्या कुटुंबीयांना परत केली. या बॅगमध्ये १ लाख ५० हजार ६५० रुपये होते. ही घटना १० एप्रिलच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल एव्हेन्यूवरील दर्शन टॉवरजवळ घडली.