Nagpur Pollution Crisis
esakal
नागपूर शहर सध्या प्रदूषणाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी ‘ग्रीन सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेली संत्रानगरी आता वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणामुळे त्रस्त झाली आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेली मेट्रोची कामे, उड्डाणपूल, वाढती वाहनसंख्या आणि औद्योगिक पट्ट्यांमधून निघणारा धूर यामुळे शहराचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र समोर येत आहे.