Nagpur: पाकिस्तानी ‘टॉक शो’मध्ये नागपूरचे गुणगान; खबरनाक कार्यक्रमात तर्री पोहा, मेट्रोचा उल्लेख

Nagpur
Nagpuresakal

नागपूर: क्रिकेट असो किंवा राजकारण. पाकिस्तानविषयी बोलताना ‘आपला शेजारी’ पेक्षा ‘आपला शत्रू’ म्हणून दृष्टिकोन ठेऊनच अधिक बोलले जाते. पाकमधील एका एका ‘टॉक शो’मध्ये मात्र या उलट घडले असून मध्य भारतातील आपल्या नागपूर शहराबाबत गुण-गाण केले आहे. खबरनाक या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तर्री पोहा, मेट्रो अशा नागपूरच्या अनेक विशेषतांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पाकिस्तानी टॉक शोमध्ये नागपूरचे गुण-गाण

उर्दू आणि पंजाबी मिश्र भाषेमधील या कार्यक्रमात जगभरातील शहरांवर कॉमेडी ढंगात चर्चा होते. या मालिकेचा व्हायरल झालेला भाग नागपूरवर आधारित असल्याने सोशल मीडियावर याची दिवसभर चर्चा होती.

नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आणि राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर असल्याचे निवेदिका आयेशा जहाँजेब अधोरेखित करताना दिसते. पुढे तेलंगखेडी मंदिराजवळील समोसे आणि जगप्रसिद्ध नागपुरी तर्री पोह्याचाही उल्लेख यामध्ये होताना दिसला.

सोबतच राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, धम्मचक्र स्तूप म्हणून ओळखली जाणाऱ्या दीक्षाभूमीच्या वास्तूचाही व्हिडीओत संदर्भ देण्यात आला आहे.

Nagpur
Pune News : पुण्यातही झोपडीधारकांना मिळणार अडीच लाखात घर; राज्य सरकारचा निर्णय

यात शहरातील नामांकित व्यक्‍तींचाही उल्लेख करण्यात आला असून यामध्ये शांततेसाठी कार्य करणाऱ्या निर्मला देशपांडे आणि आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या नावाचा समावेश आहे.

व्हिडीओ क्लिपने नागपूरकरांमध्ये लक्षणीय उत्सुकता निर्माण केली आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर कार्यक्रमाचे आणि पाकिस्तानी आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. माहिती आणि विनोद यांचे मिश्रण लक्ष वेधून घेत आहे.

अनेक ठिकाणची छायाचित्रेही झळकली

कार्यक्रमादरम्यान शहरातील अनेक निसर्गरम्य ठिकाणांच्या छायाचित्रांची झलकही दाखवण्यात आली. यामध्ये नागपूरमधील झिरो माईल, सदर उड्डाणपूल, दीक्षाभूमी, स्वामी नारायण मंदिर, नाग नदी, मेट्रो ब्रिज आणि विमानतळ मेट्रो स्टेशन या चित्रांचा समावेश आहे. यासोबतच नागपूरची हिरवळ बहुतांश वेळा पडद्यावर दाखवण्यात आली आहे.

Nagpur
Pune: पुणेकरांना दिलासा! झोपडीधारकांना अडीच लाखांत मिळणार घर; २०१० ते २०११ पर्यंतच्या रहिवाशांना लाभ

कार्यक्रमातील अन्य उल्लेख

मुंबई आणि पुण्यानंतर नागपूर हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे.

ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

शिक्षणाचे प्रमाण ९२ टक्क्यांच्या वर आहे.

या शहराला ऑरेंज सिटी म्हणतात. कारण इथे संत्र्यांचे उत्पादन खूप होते आणि ती खूप प्रसिद्ध आहे.

याला टायगर कॅपिटल असेही म्हणतात. कारण येथे अनेक व्याघ्र प्रकल्प आहेत.

येथे एक आयटी पार्क देखील आहे. शिक्षणाचे प्रमाण ९२ टक्के

हे भारताच्या मध्यभागी वसलेले शहर असून येथे शून्य मैल आहे.

भारतातील सर्वोत्तम आणि स्वच्छ शहरांमध्ये नागपूरचा समावेश होतो.

शहराची स्थापना बख्त बुलंद शाह यांनी १२ गावे मिळून केली.

शहरातून वाहणारी‘नागनदी’ आहे. त्यामुळे, शहराचे नाव नागपूर ठेवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com