Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना
Nagpur Crime: Pregnant Woman Killed and Body Dumped Roadside: सावनेरमध्ये घडलेल्या घटनेने नागपूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
नागपूरः गरोदर महिलेचा खून करुन तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने सदरील प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हितज्योती फाऊंडेशनच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.