Nagpur : पावणेदोनशे टन निर्माल्यातून गांडूळ खत निर्मिती

शहरातील उद्याने बहरणार भांडेवाडीत प्रक्रिया
nagpur
nagpursakal

नागपूर - गणेशोत्सवा त यंदा सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घराघरातून पावणेदोनशे टन निर्माल्य गोळा करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निर्माल्यात वाढ झाली असून भांडेवाडी येथे या निर्माल्यातून २५ ते ३० टन गांडूळ खत तयार करण्यात येणार असून त्याचा वापर मनपा व नासुप्रच्या उद्यानांमध्ये केला जाणार आहे.

यंदा महापालिकेने दहाही झोनमधून निर्माल्य संकलनासाठी रथ तयार केला होता. याशिवाय कृत्रिम विसर्जन टॅंकजवळही निर्माल्य कलश बनविले होते. दहाही झोन तसेच कोराडी येथील विसर्जन टॅंकजवळील निर्माल्य कलशातून १७८.२ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी प्रत्येक झोनमध्ये पाच-पाच निर्माल्य रथाची व्यवस्था महापालिकेने केली होती. याशिवाय प्रत्येकी दोन वाहने अतिरिक्त ठेवण्यात आली होती.

सार्वजनिक गणेश मंडळाचे निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य रथची सुविधा होता. याशिवाय नागरिकांनाही त्यांच्या घरातील निर्माल्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या निर्माल्य कलशमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर झोनमधून निर्माल्य संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीकडे होती तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील निर्माल्य संकलनाची जबाबदारी बीव्हीजी या कंपनीकडे होती.

nagpur
Nag Panchami 2023 : वर्षातून एकदाच उघडतं हे मंदिर, माता पार्वती अन् महादेव शेषनागावर आहेत विराजमान

कोराडी तलाव परिसरातील विसर्जन टॅंकमध्ये मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. येथेही मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा झाले असून यंदा अधिक निर्माल्य गोळा झाले. मागील वर्षी १५४ टन निर्माल्य गोळा झाले होते. यावर्षी नेहरूनगर झोनमध्ये सर्वाधिक २७.०३ टन निर्माल्य गोळा करण्यात आले.

nagpur
Ahmednagar News : नगरकरांची घरे तपासणार प्रयोगशाळा

या झोनमध्ये १९ हजार ६७० मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. परंतु सार्वधिक २८ हजार ७९६ मूर्ती विसर्जित करण्यात आलेल्या धरमपेठ झोनमध्ये २० टन निर्माल्य गोळा करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनमध्ये १६ हजाप ४९४ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.

येथे २३.२२ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. कोराडी येथे ४ टन निर्माल्य महापालिकेने गोळा केले.

nagpur
Sport News : भारतीय टेनिस संघ इस्लामाबादमध्ये खेळणार ?

कोरोना काळाच्या तुलनेत तिपटीने निर्माल्य

कोरोना काळात २०२० मध्ये केवळ ६२.५१ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. यावर्षी निर्माल्यात तिपटीने वाढ झाली. मागील वर्षी १५४ टन निर्माल्य गोळा करण्यात आले होते. २०२१ मध्ये १२७ टन तर २०१९ मध्ये दशकातील सर्वाधिक निर्माल्याची नोंद झाली. २०१९ मध्ये १७९.५ टन निर्माल्य गोळा झाले होते.

निर्माल्यातून गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या खताची विक्री न करता महापालिकेचे व नासुप्रच्या उद्यानात वापर करण्यात येते. त्यामुळे उद्यानांमध्ये हिरवळ कायम राहणार आहे.

डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com