

नागपूर - अजनीहून पुण्याकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस दौंड मार्गावर श्रीगोंदा परिसरात शनिवारी साडेचार तास एकाच ठिकाणी उभी राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. मेगाब्लॉक असूनही गाडी रद्द न केल्याने वृद्ध, महिला व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.