
नागपूर : बहुप्रतिक्षित नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता. १०) व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखविणार आहेत. वेटिंगच्या गर्दीने त्रासलेल्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा असून, पुण्यासाठी असलेल्या गाड्यांमध्ये आणखी एका गाडीची भर पडली आहे.