Rabi Crop: यंदा हरभरा, गहू पिकाचे क्षेत्र वाढणार; कृषी विभागाची तयारी, २.३ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन
Agriculture Department: नागपूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी दोन लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. हरभरा आणि गहू पिकांचे क्षेत्र वाढवून गळीत धान्य, मोहरी व जवस लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे.
नागपूर : खरीप हंगाम संपत आला असून शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. रब्बी हंगामात २ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.