Nagpur Railway Officer Bribe: बदलीसाठी लाच मागणाऱ्या रेल्वे अधीक्षकाला अटक! सीबीआयची कारवाई, खलाशाकडून घेतले इतके हजार

खलाशाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या कार्यालयीन अधीक्षकाला अटक करण्यात आली. ही कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या पथकाने केली.
Nagpur Railway Officer Bribe: बदलीसाठी लाच मागणाऱ्या रेल्वे अधीक्षकाला अटक! सीबीआयची कारवाई,  खलाशाकडून घेतले इतके हजार

Nagpur Railway superintendent Bribe Case: खलाशाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या कार्यालयीन अधीक्षकाला अटक करण्यात आली. ही कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या पथकाने केली. मोरेश्वर अर्थमंडे (४०) रा. कामठी रोड असे लाच स्वीकारणाऱ्या अधीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी रेल्वेच्या विभागीय कार्यालयात करण्यात आली.


वर्षभरापूर्वीच नागपुरात बदली झालेले विशाल उके (३०) रेल्वे रुग्णालयात मलेरिया खलासी म्हणून कार्यरत होते. ते यापूर्वी सोलापूरमध्ये कार्यरत होते. मात्र, चार महिन्यापूर्वी मलेरिया विभाग बंद करण्यात आला. त्यामुळे मलेरिया विभागातील आठ कर्मचाऱ्यांना पर्स विभागाच्या सुपूर्द करण्यात आले.

त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रेड पे प्रमाणे रिक्त जागेवर समायोजित करायचे होते. दरम्यान कर्मचारी रिकामे असले तरी त्यांना पगार नियमित मिळत होता. विभागात रिक्त जागेचा शोध सुरूच होता. लवकर काम मिळावे यासाठी विशाल मागील तीन महिन्यांपासून मोरेश्वरकडे चकरा मारीत होते. (Latest Marathi News)

मोरेश्वरने चांगल्या ठिकाणी पाठविण्याची त्यांना हमी दिली. त्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपयांत सौदा पक्का झाला. मात्र, विशाल यांना लाच द्यायची नव्हती. त्यांनी सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची खात्री करून घेतली.

Nagpur Railway Officer Bribe: बदलीसाठी लाच मागणाऱ्या रेल्वे अधीक्षकाला अटक! सीबीआयची कारवाई,  खलाशाकडून घेतले इतके हजार
Farmer Protest Today: शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते का बंद केले? बॅरिकेड्सवरून पंजाब, हरियाणा हायकोर्ट संतापले

मंगळवारी सकाळच्या सुमारास सीबीआयचे पथक रेल्वेच्या कार्यालयात धडकले. ठरल्या प्रमाणे विशालकडून लाच स्वीकारताच पथकाने मोरेश्वरला ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे रेल्वेत खळबळ उडाली. दरम्यान पथकाने मोरेश्वर यांचे कार्यालय तर दुसऱ्या पथकाने त्याच्या कामठी मार्गावरील घराची झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. (Latest Marathi News)

Nagpur Railway Officer Bribe: बदलीसाठी लाच मागणाऱ्या रेल्वे अधीक्षकाला अटक! सीबीआयची कारवाई,  खलाशाकडून घेतले इतके हजार
Farmer Agitation : अन्नदात्याचा पुन्हा एल्गार! आंदोलनाला शंभू सीमेवर हिंसक वळण, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com