Farmer Protest Today: शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते का बंद केले? बॅरिकेड्सवरून पंजाब, हरियाणा हायकोर्ट संतापले

Farmer Protest Today: हरियाणाचे अतिरिक्त महाधिवक्ता दीपक सभरवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, आंदोलक ४ हजारांहून अधिक ट्रॅक्टर-ट्रेलर घेऊन आले आहेत, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Farmer Protest Today
Farmer Protest TodayEsakal

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्ते बंद करण्यावरून हायकोर्टाने हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. एका जनहित याचिकावरील सुनावणीदरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर जमत होते कारण त्यांना एकत्र येण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. याशिवाय न्यायालयाने याप्रकरणी पंजाब सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

हरियाणातील सीमा बंद आणि इंटरनेट सेवांवर बंदी घालण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जीएस संधावालिया आणि न्यायमूर्ती लुपिता बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सरकारविरोधात पुन्हा एकदा शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे कूच करत आहेत.

Farmer Protest Today
Delhi Farmers Protest: चर्चा निष्फळ! शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तटबंदी; सोनीपतमध्ये डिझेल-पेट्रोलच्या विक्रीवर निर्बंध, जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

सुनावणीदरम्यान, हरियाणाचे अतिरिक्त महाधिवक्ता दीपक सभरवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, आंदोलक 4 हजारांहून अधिक ट्रॅक्टर-ट्रेलर घेऊन आले होते, ज्यामुळे सरकारने या उपाययोजना केल्या आहेत. पंचकुलाचे वकील उदय प्रताप सिंह यांच्यावतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की, कलम 144 लागू करणे आणि हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये बॅरिकेड्स, खिळे बसवणे हा लोकशाही अभिव्यक्ती दाबण्याचा प्रयत्न आहे.

Farmer Protest Today
Delhi Farmers Protest 2.0: सहा महिन्यांचे राशन, गुरुद्वारा-आश्रममध्ये राहण्याची सोय; शेतकऱ्यांच्या तयारीचा 'गुप्तचर अहवाल' काय सांगतो?

न्यायालयाने हरियाणा आणि पंजाब सरकारला गुरुवारपर्यंत स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. चंदीगडलाही अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयालाही पक्षकार बनवले असून याप्रकरणी किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) यांच्याकडूनही उत्तर मागितले आहे.

Farmer Protest Today
Delhi Farmers Protest: दिल्लीत पुन्हा शेतकरी मोर्चा; इंटरनेट बंद, हरयाणा-पंजाब बॉर्डर सील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com