Nagpur Rain: मनपा प्रशासनाची उडाली तारांबळ, अनेक रस्ते झाले जलमय
Monsoon Update: नागपूरमध्ये संततधार पावसामुळे सात ठिकाणी झाडे कोसळली, रस्ते जलमय झाले. अंबाझरी आणि गोरेवाडा तलाव भरू लागले आहेत. पाणी पातळी वाढल्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नागपूर : पावसामुळे सिव्हिल लाइन्सस्थित रविभवनसह सातहून अधिक ठिकाणी झाडांची पडझड झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हाणी झाली नसली तरी, यामध्ये वाहनांचे नुकसान झाले.